शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
4
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
5
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
6
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
7
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
8
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
9
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
10
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
11
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
12
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
13
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
14
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
15
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
16
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
17
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
18
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
19
Royal Enfield ने जारी केली यादी; Hunter, Classic, Meteor..; पाहा सर्व गाड्यांची नवी किंमत

सीपीआरला हवाय ‘आधार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 00:18 IST

गणेश शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जन्म-मृत्यूच्या नोंदणीसाठी आधार कार्ड अनिवार्य असून, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये (सीपीआर) मात्र रुग्णांचे नातेवाईक आधार नंबर देण्यास टाळाटाळ करताना दिसतात. त्यामुळेच महापालिकेकडे सीपीआरमधील जन्म-मृत्यूच्या नोंदी होण्यास अडथळा येत आहे. यासाठी महापालिकेने आता २१ दिवसांत जन्म-मृत्यूच्या नोंदीसाठी आधार क्रमांक न दिल्यास दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात ...

गणेश शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जन्म-मृत्यूच्या नोंदणीसाठी आधार कार्ड अनिवार्य असून, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये (सीपीआर) मात्र रुग्णांचे नातेवाईक आधार नंबर देण्यास टाळाटाळ करताना दिसतात. त्यामुळेच महापालिकेकडे सीपीआरमधील जन्म-मृत्यूच्या नोंदी होण्यास अडथळा येत आहे. यासाठी महापालिकेने आता २१ दिवसांत जन्म-मृत्यूच्या नोंदीसाठी आधार क्रमांक न दिल्यास दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे.जन्मापासून मृत्यूपर्यंत तसेच बॅँकांपासून मोबाईलपर्यंत आज आधार कार्ड सक्तीचे आहे. मात्र, याबाबत अनेकांना गांभीर्य नसल्याने सीपीआर कर्मचाºयांना मृत्यूच्या नोंदी करण्यासाठी आधार कार्डसाठी अनेकदा मृतांच्या नातेवाइकांकडे हेलपाटे मारावे लागत आहेत. १७ नोव्हेंबर २०१७ पासून ते ६ जानेवारी २०१८ अखेर सीपीआरमध्ये ३८ मृत्यू झाले आहेत; पण त्यांचा आधार क्रमांक नसल्याने या मृत्यूच्या नोंदी महापालिकेकडे प्रलंबित आहेत. त्या नोंदी दप्तरी व्हाव्यात, यासाठी महापालिकेने सीपीआरकडे आधार क्रमांकासाठी तगादा लावला आहे.सीपीआरमध्ये मृत व्यक्तीचा आधार क्रमांक मिळत नसल्याने त्याच्या नोंदी करून घ्याव्यात, असे पत्र सीपीआरने महापालिकेला दिले आहे. कारण सीपीआरमध्ये उपचारासाठी आलेल्या सर्वच रुग्णांच्या नातेवाइकांकडे आधार कार्ड उपलब्ध नसते तसेच अनेक बेवारस व बेघर रुग्णही उपचारासाठी येतात. त्यांच्या मृत्यूनंतर आधारची सक्ती कोणाकडे करायची? असा प्रश्नही कर्मचाºयांना असतो. ‘आधार’ची सक्ती करून मृतदेह रोखून धरल्यास नातेवाइकांच्या रोषास सामोरे जावे लागते. त्यामुळे ‘आधार’चा गुंता कसा सोडवायचा, असा यक्षप्रश्न सीपीआर प्रशासनासमोर आहे.जन्माच्या नोंदीही प्रलंबितमृत्यूची नोंद करण्यासाठी जसा आधार क्रमांक गरजेचा आहे, तसाच जन्माच्या नोंदीसाठी पालकांच्या आधाराची गरज आहे. त्यामुळेच २५ आॅक्टोबर २०१७ पासून महापालिकेच्या पातळीवर ६७ जन्मनोंदी प्रलंबित आहेत.